Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

धायरी च्या शिवकालीन श्री अंबाईमातेचा नवरात्र उत्सवात हजारो भाविकांची गर्दी

पुणे: धायरी सिंहगड भागातील मावळ्यांची स्फूर्ती देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या धायरी येथील शिवकालीन अंबाईमाता देवीचा नवरात्र उत्सवात दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत.

दोन वर्षांनंतर यंदा पारंपरिक ऐतिहासिक रिवाजात भव्यतेने साजरा करण्यात येत आहे. ग्रामस्थ, दानशूर व्यक्तींच्या वतीने दररोज तीन ते चार हजारावर भाविकांना अन्नदान, फराळाचे वाटप केले जात आहे. आज धायरी, सातारा पुणे भागातील महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पाणी, दर्शन मंडप आदी़ची सोय केली आहे.
देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील , कार्याध्यक्ष चंद्रकांत वांजळे , सचिव भाऊसाहेब कामठे, खजिनदार मदन भोसले ,विश्वस सोपान लायगुडे. बाजीराव चौधरी ,चंद्रकांत पोकळे, हिरामण पोकळे बाळासाहेब कामठे आदींसह पद्माकर लायगुडे, मिलिंद पोकळे ग्रामस्थांच्या देखरेखीखाली दर्शनबारी, पाणी,जेवण नाष्टा आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
धायरी गावाच्या शेजारील डोंगराच्या कुशीत देवीचे मंदिर आहे. देवीच्या नवरात्र उत्सावास शिवकाळा पासून साडेतीनशे वर्षाची ऐतिहासिक पंरापंरा आहे. देवीची मुर्ती सुबक व दगडी पाषाणाची आहे. जागृत देवस्थान अशी परिसरात ओळख आहे. दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यंदा भव्यदिव्य ऐतिहासिक रिवाजात उत्सव साजरा केला जात आहे. सर्व जाती धर्माचे एक लाखाहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत. असे देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवात पुजा, अभिषेक, आरती ,जागर,प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजीत केले आहेत. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading