fbpx

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी ॲड. मंदार जोशी यांची निवड झाली आहे. ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोशी यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

ॲड. मंदार जोशी आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनसह अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार आहेत. आखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाचे युवक अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. ॲड. जोशी यांचा या निवडीबद्दल पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ॲड. मंदार जोशी म्हणाले, “पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद वाटतो. तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘रिपाइं’ कायम अग्रेसर असते. राज्यभरात पक्षवाढीसाठी योगदान देणार आहे. समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: