Tuesday, June 16, 2026
BLOGLatest News

घटनात्मक मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी – भारत जोडो यात्रा

भारत जोडो चे नेमके उद्दिष्ट काय…हे यात्रा काढणारेच सांगू शकतात..! “लोकशाहीरूपी प्रजासत्ताक” भारतात देशवासीयांसाठी यात्रेचे प्रायोजन करण्यात आले, हे आता जनता चांगल्या प्रकारे समजू लागल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानेच, भारत तोडावयास निधालेले खोटेपणाचे महामेरू साहजिकच गप्प कसे बसणार (?) हे देखील ओघानेच आले..!

 
इंग्रजांच्या गुलामगिरीत ‘राजेशाही – निजामशाही’मघ्ये विभागलेला देश ‘स्वातंत्र्य प्राप्ती’नंतर लोकशाही ‘प्रजासत्ताक भारत’ म्हणून ऊदयास आला व करोडपती ते दारिद्र्यपती यांना संविधानात्मक ‘समान मताचा’ अधिकार मिळाल्यावर प्रजेचे नागरीक झाले. संघराज्य प्रणीत भारतात ७५ व्या वर्षी भारत जोड़ों यात्रा काढणयाची वेळ आली कारण धर्मनिरपेक्षतेचा डीएनए असलेल्या भारतात, टोकाचा धर्मवाद, जातीयवाद नियंत्रित करण्यासाठी, पसरवण्यात येणारा धार्मिक विद्वेष थांबवण्यासाठी व संविघानीक मुल्यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक होते…! स्वातंत्र्य हे भिकेत नव्हे तर इंग्रज विरोधी प्रदीर्घ लढ्यात हजारो देशभक्तांच्या कडव्या झुंजीमुळे, शहीदत्वामुळे, प्राणांच्या बलीदानामुळे मिळाले व ते व्यर्थ जाऊ नये म्हणूनच, ‘कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या’ संकल्पाची पुर्ती करीत स्वातंत्र्याचा मुळ हेतू साध्य होण्यासाठीच ही भारत जोड़ों यात्रा आहे ही वास्तवता सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी हे मान्य करणार नाहीतच..
स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे वक्तव्य करणाऱ्या नटीस पदमश्री देंणे, महात्मा गांधी च्या हत्येचे समर्थन करणाऱ्यास खासदारकी देणे, भाजप प्रवक्त्या नुपुर शर्माच्या धार्मिक द्वेषात्मक वक्तव्यामुळे जगात नामुष्की व देशात हिंसा घडल्यावर देखील पंतप्रधानांनी शांतते विषयी वक्तव्य न करणे, धार्मिक विद्वेषात्मक हिंसा दाखवणाऱ्या ‘काश्मिर फाईल्स’ सिनेमास टॅक्स फ्री करणे, तो बघण्यास सरकारी सुट्टी देणे, महीलेवरील सामूहिक बलात्कार व बाळाची हत्या करण्याच्या आरोपींना जेल मुक्त करणे इ. खेदजनक घटना वाढत असल्याने निर्भय व विश्वासदायी वातावरण प्रस्थापित होण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक होते..! दिल्ली दंगल प्रकरणी केंद्रीय मंत्री गोली मारो म्हणतात, पुलवामा मधील ४० जवानांच्या हत्ये प्रकरणी चौकशी नाही, सीआरपीएफ़ ऊपअधिक्षक देविंदर सिंग २ अतिरेक्यांसोबत सापडून ही कारवाईवर प्रश्नचिन्ह आहे.. शेतकरी आंदोलन करतांना केंद्रीय मंत्र्याचा मुलगा ट्रॅक्टर अंगावर धालून त्यांना चिरडतो, हे कशाचे द्योतक…?
लोकशाहीचा ४था स्तंभ ‘सर्वोच्च न्यायालयाचे’ ४ न्यायमूर्ति आमचेवर दबाव असल्याचे माध्यमांसमोर ‘जनतेच्या न्यायालयात’ सांगतात तेंव्हा देश तुटला आहे, संविधान भंग पावले आहे असे नाहीतर काय म्हणणार..?


गौरी लंकेश, पानसरे, कमलेश, सुबोध सिंग, अखलख पेहलू, कन्हैय्या च्या हत्या कशाचे द्योतक ..? निव्वळ धार्मिक विषमताच नव्हे तर देशात मोदी सरकार कडून राष्ट्रीय संपत्तींचे मोठ्या प्रमाणातील खाजगी करण, देशावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, पेट्रोल-डीझेल एक्साईज ४ पटींने वाढ करून चाललेली लुट, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तुंवरील करवाढ, लोकांचे घटते रोज़गार, जागतिक पातळींवर खालावलेला भूकबळी दर, चिनचे आक्रमण, चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक मंदी, रूपयाचें वाढते अवमूल्यन तसेच बँका लुटुन देशा बाहेर जाणाऱ्यांवर कारवाई नाही इ बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी ही यात्रा आहे.
मा राहूल गांधी यांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मगुरूंशी भेट घेतल्याचेच फक्त लक्ष ठेवणाऱ्या माधव भंडारींना व स्मृतींईराणींना राहुल गांधी स्वामी विवेकानंद स्मृतीसथळास प्रार्थना करून व प्रदक्षिणा केलेली दिसली नाही (?) का त्यांचे विषयी मत्सरापोटी फक्त बदनामीच करायची..? राहुल गांधी -प्रियंका यांनी शारदा पिठाच्या शंकराचार्यांप्रती सदभावना, श्रद्धांजली पर भेंटी, माता अमृतानंदमयी सोबत भेट – दर्शन, श्री नारायण गुरू सिवगिरी मठ, लिंगायत स्वामी मठ इ भेटी दिसल्या नाहीत काय…(?) भाजप नेते किती दिवस खोटे पणाचा आघार घेणार…?
समाजात देशात जागरूकता आणणे, देशापुढील आर्थिक – सामाजिक विषमता विषद करणे हे विरोघी पक्षाचे संविधानिक कर्तव्य आहें.. काँग्रेसने पुढाकार घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या व आर्थिक महासत्तेकडे वाटचाल होऊ घातलेल्या देशात धार्मिक ऊन्माद _ विद्वेष व आर्थिक पराकोटीची विषमता पसरवून देशाचे तुकडे पाडू पाहणाऱ्यांचे संधीसाधू मनसुबे पुर्ण होऊ दिले जाणार नाहीत व याच भावनेने देशाच्या ऐक्य व अखंडत्वासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी देशांतील विविंध राजकीय मत-मतांतरे असलेल्या पक्षांना, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन, काँग्रेसचे निवडणुक चिन्ह बाजूस ठेवुन राष्ट्रीय तिरंगा घेऊन भारत जोडो यात्रेस निघाले आहे…देशाच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकास जाण्यासाठी मधोमघ सरळ मार्ग निवडला आहे.
“पंतप्रधान मोदीजींनी ‘संसदेच्या पायरीवर’ डोके टेकवले व २०१९ला ‘संविधानास’ नमस्कार केला.. मात्र मोदींचे प्रथम पंचवार्षिक मघ्ये ७०% विधेयकांवर ‘चर्चा होण्यापुर्वीच्’ वटहुकुम निघाले जो काँग्रेस – युपीए काळात हा दर ३०% होता…तदनंतर मात्र चालू काळात विधेयकांवर चर्चा होण्यापुर्वी वटहुकुम निघण्याचे प्रमाण सु ९५% वर गेले. अर्थात संसदेस नतमस्तक होणाऱ्यांकडून कृती मात्र विरोधी होत आहे. संसदेत मुलभूत प्रश्नांवर, विघेयकांवर चर्चा होऊ दिली जात नाही. संसदीय मुल्यांपासुन व कर्तव्यांपासुन तुटलेला भारत जोडण्यासाठी, भारतास पुर्वपदावर आणण्यास जनतेसच जागरूकतेने भुमिका निभावी लागणार असल्याने या पदयात्रेचे प्रायोजन..!
तसेच विविध राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे चालवण्यात वा पाडण्यात ‘संविधानिक पदी असलेल्या राज्यपालांची भुमिका काय’(?) ती संविधानिक होती काय (?) यावर जनतेच्या भावना काय आहेत ..(?) याबाबत जनता जागरूक आहे काय इ प्रश्नांचा ऊहापोह होऊन संविधानिक मुल्यांची व घटनेची पायमल्ली होऊ नये.. म्हणून देखील ही भारत जोडो यात्रा आहे व त्याद्वारे संविधान वाचवणे हीच काँग्रेस भुमिका आहे”…!
चिन राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान झोके घेतात, मात्र चिन चे अतिक्रमण मान्य करत नाहीत मात्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व परराष्ट्र मंत्री जयशंकर मात्र संसदेत चिनचा शिरकाव मान्य करतात..हा विरोधाभास का..? भाजपने अजुनही पंडीत नेहरू आदींवर खापर फोडण्याचे व मुख्य समस्येपासुन पळपुटी भूमिका घेणे बंद करावे व हिंमत असल्यास संरंक्षण सिध्दतेवर श्वेत पत्रीका काढावी…!
‘भारत जोडो’ यात्रा संविधान, लोकशाही व नागरीहक्कांचे मुल्ये विषद करणारी आहे.. म्हणूनच प्रत्येक भारतीयांस ही यात्रा शक्तीवर्धक, राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, ऐक्यभावना बंधूभाव वाढवणारी व घटनात्मक मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी ऊपयुक्तच ठरणारी आहे…


⁃ गोपाळदादा तिवारी (प्रवक्ता – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading