११ व्या राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप स्पर्धेत पीएमपीएमएल च्या हर्षल गरड यांनी जिंकले ‘कांस्य पदक’
पुणे : उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘११ व्या राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धेत पुणे
महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या हर्षल तानाजी गरड यांनी स्पर्धेमध्ये सहभाग
नोंदवून ‘कांस्य पदक’ जिंकले.
‘११ वी राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धा दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत
उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथे केडी सिंग बाबू स्टेडियमच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडली. यास्पर्धेत महाराष्ट्रातून
१५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यास्पर्धेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या
हर्षल तानाजी गरड यांनी सहभाग नोंदवुन ‘कांस्य पदक’ जिंकले. लखनऊ येथे उत्तरप्रदेशचे माजी जलविद्युत मंत्री
आमदार डॉ. महेंद्र सिंह, ओविनाम असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण गर्ग, महानगर उपाध्यक्ष घनश्याम
अग्रवाल, प्रादेशिक क्रीडा अधिकारी अजय सेठी यांच्या प्रमुख उपस्थित गरड यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
‘११ व्या राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धेत हर्षल तानाजी गरड यांना ‘कांस्य पदक’ मिळाल्या बद्दल पुणे
महानगर परिवहन महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, मुख्य कार्यकारी अधिकरी प्रज्ञा
पोतदार – पवार व कंपनी सेक्रेटरी निता भरमकर यांनी गरड यांचा सत्कार केला.