fbpx
Thursday, May 16, 2024
BusinessLatest News

पेपरफ्रायने पुण्यामध्ये नवा स्टुडिओ सुरु केला

पुणे : ई-कॉमर्समार्फत फर्निचर आणि इतर घरगुती वस्तूंची विक्री करणारी कंपनी पेपरफ्रायने महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आपला नवा स्टुडिओ सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. निम्न श्रेणीच्या बाजारपेठांमध्ये विस्तार करत भारतभरात घरगुती आणि जीवनशैलीशी निगडित वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये अनेक वेगवेगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने ऑफलाईन विस्ताराचे हे पाऊल उचलले गेले आहे. आज देशभरात ९० पेक्षा जास्त शहरांमध्ये पेपरफ्रायचे १८० पेक्षा जास्त स्टुडिओ आहेत.

पेपरफ्राय स्टुडिओनी भारतात फर्निचर रिटेल उद्योगक्षेत्रात नवे परिवर्तन घडवून आणले आहे.  अनेक वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये विस्ताराच्या कंपनीच्या धोरणाला अनुसरून देशभरात फोफो (स्टुडिओची मालकी व संचालन फ्रँचायझीचे) स्टुडिओ सुरु केले जात आहेत.  सध्या ही कंपनी ९० पेक्षा जास्त भागीदारांसोबत काम करत आहे. ईशान्य ब्रँड सर्व्हिसेस लिमिटेडसोबत भागीदारीमध्ये सुरु करण्यात आलेला नवा स्टुडिओ पुण्यामध्ये पिसोळी रोडवर नारायणदास मोटवानीमध्ये असून त्याचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ २६६० चौरस फीट आहे. पेपरफ्राय स्टुडिओमध्ये ग्राहकांना फर्निचर आणि घरगुती उपयोगाच्या उत्पादनांची विशाल श्रेणी पाहता येते. याठिकाणी ग्राहक कंपनीच्या इंटीरियर डिझाईन कंसल्टंट्सकडून डिझाईनविषयी विशेष सल्ला मिळवू शकतात.

पेपरफ्रायच्या बिझनेस हेड – फ्रँचायझिंग अँड अलायन्सेस अमृता गुप्ता म्हणाल्या, “पुण्यामध्ये ईशान्य ब्रँड सर्व्हिसेस लिमिटेडसोबत आमचा नवा स्टुडिओ लॉन्च करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पेपरफ्राय फ्रँचायझीची मालकी मिळवणे ही बाब व्यवसायामध्ये यश मिळण्यासारखी आहे.  महानगरे आणि प्रथम श्रेणी शहरांच्या बाहेर प्रचंड संख्येने असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे आमचे उद्दिष्ट आहे.  आमच्या फ्रँचायझी भागीदारांमध्ये यशस्वी उद्योजक, महिला उद्योजिका, सेनेतील माजी कर्मचारी आणि पहिल्यांदाच व्यवसायात उतरणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक आहेत. आज पेपरफ्रायमध्ये ग्राहकांसोबत संपर्क, संवाद साधताना एआर आणि व्हर्च्युअल प्रोडक्ट इंटरॅक्शनचा उपयोग केला जातो.  जगभरात घर ही भावना निर्माण करवून देण्याच्या आमच्या दृष्टिकोनानुसार आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट ग्राहकसेवा प्रदान करतो.”

पेपरफ्राय पुणे पिसोळीचे मालक जय ससाणे म्हणाले, “घरगुती वस्तू आणि फर्निचरची भारतातील आघाडीची बाजारपेठ पेपरफ्रायसोबत भागीदारी करून आम्ही खूप खुश आहोत. कंपनीने वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये एका अनोख्या व्यवसायाची सुरुवात केली आहे आणि सर्वात मोठ्या ओम्नीचॅनेल होम अँड फर्निचर व्यवसायाच्या निर्मितीमध्ये त्यांची साथ देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading