Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

पुणे : शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहितीही जाणून घेतली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आदित्य ठाकरे यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडनंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता देखील मी पुण्यात आली होतो. त्याचप्रमाणे आज नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेण्याकरिता आलो आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे, लोक सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे चांगले वातावरण आहे. देवीसमोर मी नेहमी हात जोडून नमस्कार करतो आणि आशिर्वाद घेतो. त्याप्रमाणे आजही आशिर्वाद घेत आहे.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading