fbpx

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची संपूर्ण देशाला उत्सुकता – आदित्य ठाकरे

पुणे : दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेचा व शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. कोणाचा मेळावा हा जोरदार होणार याची चर्चा रंगू लागली आहे. त्यावर पण परंपरेनुसार आमचा म्हणजेच शिवसेनेचा शिवतीर्थावर मेळावा आहे.आणि तो कायम तसाच राहणार आहे.अनेक लोक वेगवेगळे मेळावे करू शकतात .संपूर्ण देशाला शिवसेनेचा दसरा मेळावा बघण्यासाठी उत्सुकता आहे. तसेच  शिंदे – फडणवीस  सरकार घटनाबाह्य बनलेलं आहे असा पुनरुच्चार युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना केला. 

आज युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील नवरात्र मंडळांना भेटी दिल्या. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांची संवाद साधला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या  काही दिवसात महाराष्ट्र दोरा करणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरू केली आहे. त्यावर आता शिव संवाद यात्रा आम्ही दौरा करत आहोत.उद्धव साहेब देखील त्यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच  वर्षानुवर्ष आई टेंभी नाक्यावर जात असते आणि याही वर्षी त्या फक्त दर्शनासाठी गेल्या होत्या असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेची ताकद असती, तर 50 आमदार आणि 12 खासदार आपल्याला सोडून गेले नसते,  अशी टीका रामदास कदम यांनी केली त्यावर आदित्य म्हणाले,  माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मी फक्त चांगल्या गोष्टींवर बोलतो. जे वेडे वाकडे आरोप करत आहेत त्यांच्यावर कधीच बोलू नये. तसेच भाजप नेते राम कदम यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे मदत मागणार आहे. यावर म्हणाले मला ती पेंग्विन म्हणतात त्याचा मला अभिमान आहे.पेंग्विन आल्यानंतर अनेक लोक प्राणी संग्रहालयात आले त्यामुळे मला अभिमान आहे. खोके सरकारने आमच्यावर टीका करणच हास्यास्पद आहे.

भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मंडळाला देणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे  पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन शक्ती प्रदर्शन करणार का अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आदित्य म्हणाले,मी कोथरूड ला जाणार आहे.आम्ही दोघांनी गणपतीच्या पालखीला खांदा देखील लावला होता.चंद्रकांत पाटलांचा मतदारसंघ असं काही नाही मी कुठेही जाऊ शकतो. असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: