हो, शरद पवार ज्या वेळी महाराष्ट्राचा दौरा करतात त्यावेळी सत्तांतर होते; अमोल मिटकरी यांनी केली सुप्रियाताईंची पाठराखण
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आले आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत., मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वांत जास्त प्रेम दिले आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यावर सुप्रिया यांनी जे वक्तव्य केलं तर खरंच आहे.शरद पवार ज्या ज्या वेळी महाराष्ट्राचा दौरा करतात त्यावेळी सत्तातर होते. साताऱ्यातील सभा त्याचं उदाहरण आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे यांची पाठराखण केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले,काही लोकं शरद पवारांचे नाव स्वतःच्या पब्लिसिटीसाठी घेतात.त्यांना महत्व देण्याची गरज नाही. मात्र त्यांचे बारामतीत डिपॉझिट जप्त झाले आहे. असे बोलून अमोल मिटकरी यांनीगोपीचंद पडळकर यांच्यावर टीका. केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सारखे म्हणत असतात, बारामती शरद पवार यांचे डिपॉझिट जप्त होईल त्यावर अमोल मिटकरी म्हणाले,शरद पवार सोडा मात्र आम्ही जरी बाहेर पडलो तरी तुमचे डिपॉझिट जप्त होईल असे अमोल मिटकरी म्हणाले.
जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत,” असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील “संवाद बुद्धिवंतांशी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले,पंकजा मुंडे पक्षात प्रचंड अस्वस्थ आहेत, त्यामुळे त्या भाजपला लवकरच सोडचिठ्ठी देतील, त्यांचं राष्ट्रवादीत स्वागत आहे असे अमोल मिटकरी म्हणाले.