fbpx

MIT मधील पाकिस्तानच्या झेंड्याचे भाजप युवा मोर्चाकडुन दहन

पुणे:पाकिस्तान दिवसरात्र भारतात दंगे घडविणे, दहशतवादी हल्ले करणे, भारत देश अशांत ठेवणे, परराष्ट्राच्या अध्यक्ष भारतात आल्यावर दंगे भडकवणे यासारखे षढयंत्र रचत असतो, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हजारो निष्पाप नागरिकांचा बळी तर गेलाच आहे लाखो सैनिकानां शहीद व्हावे लागले आहे, काश्मिरी पंडीतानां पलायन करावे लागले,दहशतवादाची जननी असलेल्या पाकिस्तानचा झेंडा विश्वशांती या गोंडस नावाखाली MIT प्रशासनाकडुन कोथरूड मधील कॅम्पस मध्ये लावला होता.

याबाबतची माहीती मिळताच कोथरुड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी MIT च्या प्रशासनास पाकिस्तानचा झेंडा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यास गेले असता MIT प्रशासनाकडुन आडेमुठेपणाची भूमिका घेतली गेली तसेच कुलगुरू यांनी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवले नाही. यामुळे युवा मोर्चाचे कार्यकर्त्यानी आक्रमक होत त्यांनी MIT कॅम्पस मधील पाकिस्तानचा झेंडा जाळून टाकत निषेध व्यक्त केला, हिंदुस्थानचे जे शत्रूराष्ट्र आहेत त्यांचे पुण्यात लावून दिले जाणार नाहीत अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा अशाच आक्रमक पध्दतीची भूमिका घेयील असा सज्जड इशारा कोथरूड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी दिला आहे. प्रसंगी शिवम बालवडकर,सौमित्र देशमुख,समीर जोरी,निलेश सोनवणे,अमित तोरडमल,कुणाल तोंडे,सायंदेव देहाडराय,साहिल भोळे,अथर्व आगाशे,सुयश ढवळे,
अर्चित मेहेंदळे युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: