fbpx

गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा – चंद्रकात पाटील

चंद्रकांत पाटील यांचे ‘ नमो करंडक स्पर्धा – २०२२’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा, या हेतूने पुण्यातील भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या वतीने ‘ नमो करंडक स्पर्धा – २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला असून, प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे.

दरम्यान, या स्पर्धेला आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, या स्पर्धेत सर्व सोसायटी आणि अपार्टमेंटने भाग घ्यावा. स्वच्छतेच्या या उत्सवात सर्वांनी मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा, स्वच्छता ही कायम करत राहण्याची प्रक्रिया आहे. यामुळे मी सर्व संस्था, सोसायट्या आणि अपार्टमेंटसना विनंती करतो की, हा नमो करंडक जिंकण्याच्या निमित्ताने एक चुरस निर्माण होऊ द्या आणि त्यातून सर्व अपार्टमेंट आणि सोसायट्या स्वच्छ होऊ द्या. गेल्या वर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यावेळी मला खूप आनंद झाला. खूप हिरहिरीने यात लोकांनी सहभाग घेतला. याही वर्षी असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करतो असं पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी या स्पर्धेत एकूण ४२ सोसायटीनीं सहभाग नोंदवत, अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता. स्पर्धेदरम्यान सोसायटी मध्ये जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेस’ चे साहित्य तर महिला कर्मचाऱ्यांना पैठणी देण्यात आली होती. आता या स्पर्धेची सोसायटी सोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही चांगलीच उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: