कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाने ‘बये दार उघड ‘ मोहिमेस नवचैतन्य : डॉ. नीलम गोऱ्हे
कोल्हापूर, : राज्यात अनेकदा ग्रामीण भागात प्रवासाच्या महिलांची प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुली आणि महिलांच्या कौटुंबिक वादातून अन्य कारणाने हत्या, स्त्री भ्रूण हत्या प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागात वाढताच चालले आहे. महिलांचे अपहरण गुन्हे देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाहीत महिलांना विकासाचा अधिकार मिळण्याची गरज आहे. यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बजेट मिळाले पाहिजे. महिला सुरक्षेसाठी प्रस्तावित असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर व्हावा, अशी प्रार्थना श्री. अंबाबाईच्या चरणी केल्याचे आज शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास वाजत गाजत या असे आवाहन आज डॉ. गोऱ्हे यांनीं शिवसैनिक आणि जनतेला केले आहे.
ठाणे येथे आज सौ. रश्मीवहिनी उद्धव ठाकरे यांनी टेंभी नाका परिसरात आरती केली आहे. यामुळे राज्यभरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे उधाण आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘राज्यात तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय व्हावे. या निमित्ताने प्रत्येक तीर्थक्षेत्रावर सुविधा व्हाव्यात यासाठी आवश्यक ती कार्यवाही करता येईल.’
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा करताना कोल्हापूरकरांचा शहर भागातील विविध प्रश्नांवर मार्ग काढून त्यांना आश्वासक वातावरण देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुराच्या पाण्याने शहरात होणारे नुकसान आणि विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यात अधिक सक्षमपणे कार्यवाही व्हावी, अशा प्रकारच्या सूचना आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या.
शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी त्यांच्याशी आज श्री अंबाबाई मंदिर देवस्थान व्यवस्थापनाबाबत देखील तपशीलवार चर्चा झाली.
शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड ‘ मोहिमेच्या निमित्ताने आज त्या कोल्हापुरात आल्या होत्या. या मोहिमेला आज कोल्हापुरात शिवसेना महिला आघाडी आणि युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी, तसेच सामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने श्री. अंबाबाई मंदिर परिसरात चैतन्याचा खळाळता प्रवाह अनुभवण्यास मिळाला.
या आवारात ठिकठिकाणी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेच्या महीला पदाधिकाऱ्यांना महिला हळदी कुंकू लावून प्रेमाने स्वागत करीत होत्या. तर दत्त मंदिर, शनी मंदिरात, बालाजी मंदिर येथील पुजारी वर्गाने आपुलकीने स्वागत केले. मंदिर कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी देणगीचा धनादेश दिला. यावेळी मंदिर व्यवस्थापनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या मोहिमेत आज शिवसेना पदाधिकारी उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवती सेनेच्या पदाधिकारी दीपा पाटील, शीतल शेठ, पुणे शिवसेना महीला आघाडीच्या स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले , कोल्हापूर महिला आघाडीच्या शुभांगी पोवार, मंगल चव्हाण, स्मिता सावंत, सांगली शिवसेना पदाधिकारी बजरंग पाटील, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.
