fbpx

शिवसेनेला पुण्यात धक्का माजी नगरसेविका लीना पानसरे यांचा शिंदे गटात प्रवेश

पुणे:राज्याच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेते हे आत्ता शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळत आहे.पुण्यात शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका लीना पानसरे यांनी शिवसेना सचिव संजय मोरे शहराध्यक्ष नाना भानगिरे जिल्हाप्रमुख अजय भोसले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. लीना पानसरे या शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आहे.त्या कोथरूड मधून निवडून आल्या आहेत.आत्ता शिवसेनेला उपनगरसह कोथरूड मध्ये देखील खिंडार पडलेली पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाकडून देखील यंदाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याला पुण्यातून देखील मोठ्या संख्येने लोक हे जाणार असल्याच शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितल आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पडणार का अशी चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: