fbpx

रसिकांनी अनुभविला हिंदी सुफी गीतांचा अनमोल नजराणा

 पुणे : मेरा इश्क सुफीयना…सजदा तेरा सजदा… दिल दिया गल्ला…पिया रे पिया रे… लंबी जुदाई, चार दिनों का प्यार हो रब्बा… मितवा, कहे धडकने तुझसे क्या…मेरे रश्के कमर.. यांसारख्या हिंदी चित्रपटातील नावाजलेल्या गीतांसह भर दो झोली मेरी या मुहम्मद अली…दमादम मस्त कलंदर सारख्या कव्वालीपर्यंत एकाहून एक सरस गाण्यांनी ‘सजदा’ या कार्यक्रमामध्ये हिंदी सुफी गीतांचा अनमोल नजराणा उलगडला.

गायक आशिष देशमुख, विवेक पांडे, विनल देशमुख व राधिका अत्रे यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला भरभरुन दाद देत रसिकांनी हिंदी सुफी संगीतातील अविष्कार अनुभविले. यावेळी संदीप पंचवाटकर यांनी बहारदार निवेदन करुन सुफी संगीताचा माहिती देत शाहीरी सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली. पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

‘सजदा’ हा हिंदी सुफी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. गोंविद कुडाळकर (तबला), राजन साळवी (ढोलक), असिफ इनामदार (अ‍ॅक्टोपॅड), प्रथमेश लाड (बासरी), हार्दीक रावल (गिटार), सईद खान (सिंथेसायझर) या कलाकारांनी साथसंगत केली. या सर्व कलाकारांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कलाकारांनी नावजलेल्या प्रेम गीते, कव्वाली व एकाहून एक सरस गीते गायकांनी सादर करुन सुफी गीतांचा नजराना पुणेकरांसमोर उलगडला.

Leave a Reply

%d bloggers like this: