सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेचे २ ऑक्टोबर पासून आयोजन !
पुणे : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे सलग सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या आंतर फुटबॉल अॅकॅडमी स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध वयोगटातील ६४ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. २ ऑक्टोबर २०२२ पासून हॉटफुट अॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर होणार आहेत.
हॉटफुट अॅकॅडमी तर्फे ही स्पर्धा ८, १०, १२ आणि १४ वर्ष वयोगटामध्ये खेळवण्यात येणार आहे. लहान वयोगटात स्पर्धा खेळवण्याची संधी मिळावी व फुटबॉल क्रिडाप्रकारची रूची निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पर्धेचे संचालक अॅश्ले ब्रिगॅन्झा यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये आयोजक हॉटफुट अॅकॅडमी, पुणे फुटबॉल अॅकॅडमी, स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी, बेटा स्पोर्ट्स क्लब, स्टार फुटबॉल अॅकॅडमी, उत्कर्ष क्रिडा मंच, लौकिक फुटबॉल अॅकॅडमी, जीजी इंटरनॅशनल स्पोर्ट्स पिंपरी, साई फुटबॉल अॅकॅडमी, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी, सिटी फुटबॉल क्लब, मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी, गेम ऑफ गोल फुटबॉल अॅकॅडमी आणि बोल्ट्झ फुटबॉल क्लब हे संघ सहभागी होणार आहेत.
साखळी पद्धतीमध्ये होणारी ही स्पर्धा दर रविवारी होणार आहे. स्पर्धेच्या ८, १०, १२ आणि १४ वर्ष या प्रत्येक वयोगटामध्ये १६ संघ सहभागी झाले आहेत. ८ आणि १० वर्षाखालील स्पर्धा ६-अ-साईड, १२ वर्षाखालील ८-अ-साईड आणि १४ वर्षाखालील स्पर्धा ९-अ-साईड या पद्धतीने होणार आहे. स्पर्धेला अपोलो टायर्स यांनी मुख्य प्रायोजकत्व दिले असून स्पर्धेच्या सलग सहाव्या वर्षी त्यांनी आर्थिक पाठींबा दिला आहे.
स्पर्धेतील ८, १०, १२ आणि १४ वर्ष वयोगटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघ आणि खेळाडूंना करंडक आणि पदक मिळणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल स्कोरर अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धा २०२०:
२०२० वर्षीच्या मौसमातील विजेते आणि उपविजेतेः
८ वर्षाखालील गटः नाझ फुटबॉल अॅकॅडमी अ, दिएगोज् ज्युनिरर्स अ;
१० वर्षाखालील गटः दिएगोज् ज्युनिअर्स ब, स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी;
१२ वर्षाखालील गटः ४ लायन्स् अॅकॅडमी, स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी;
१४ वर्षाखालील गटः स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी, ४ लायन्स् अॅकॅडमी.
