fbpx

पंकजा मुंडे स्वप्नातही असं काही बोलू शकत नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हटवू शकत नाहीत,” असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील, अंबाजोगाई येथे “संवाद बुद्धिवंतांशी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यावर ‘ध’ चा ‘मा’ केल्याने गैरसमज होतात. पंकजा मुंडे स्वप्नातही काही असं बोलू शकत नाही. अशी प्रतिक्रिया भाजपचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बातचीत करताना दिली.

यावर्षी दसरा मेळावा शिवसेना व शिंदे गट करणार आहे. भाजपचे नेते कोणाचा दसरा मेळावा बघणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही बरोबर सरकारमध्ये आहोत. त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी. आम्ही आमच्या पक्षाची चिंता करावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आईला आई व बापाला बाप न मानणाऱयांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली. सत्तापक्ष म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे बनविण्याचा प्रयत्न करून देशभरात अराजक माजवणारे कितीही मस्तवाल झाले तरी आम्ही निश्चिंत आहोत. अतिथी का सामनाच्या अग्रलेखातून शिंदे व फडणवीस सरकारवर केली आहे. त्यावर माझं तो बाब्या असं शिवसेनेचा सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: