fbpx

चित्रपट क्षेत्रामध्ये मुलींचे वाढते प्रमाण ही अभिमानाची गोष्ट – विक्रम गोखले

चित्रपट मनोरंजन क्षेत्रामध्ये तरुणांना करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहे या क्षेत्रामध्ये केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर करिअर म्हणून तरुणांनी यावे असे आवाहन करतानाच चित्रपट क्षेत्रांमध्ये मुलींचे वाढते प्रमाण हे अभिमानाची गोष्ट आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे उदघाटन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लेखक शरद तांदळे, अभिनेत्री निर्माती भाग्यश्री देसाई, अभिनेते नंदू माधव, लेखिका प्रियांका चौधरी, दत्ता गुंड, जय भोसले ( संस्थापक अध्यक्ष व आयोजक ) संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिषेक अवचार ( व्यवस्थापिकिय संचालक ), अर्जून अजित ( कार्यकारी संचालक ) आदी मान्यवर उपस्थित होती.

शरद तांदळे म्हणाले की आजच्या प्रेक्षकांना ओटीटीमूळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकृती घर बसल्या पाहता येत आहेत. त्यामुळे चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांना मोठे आवाहन निर्माण झाले आहे. भाग्यश्री देसाई म्हणाल्या की लघुपट माध्यम हे प्रभावी माध्यम असून मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रांती घडवेल.

३० सप्टेंबर रोजी १० ते ४ व ४ ते ६ पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. प्रथम विजेत्या लघुपटास २१ हजार रुपये रोख रक्कम द्वितीय ११ हजार रुपये तृतीय ७ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विभागातील त तंत्रज्ञ आणि कलाकार यांना देखील रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. सदरील फेस्टिव्हल विनामूल्य आहे.

लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिनी समस्या समोर याव्यात – रामकुमार शेडगे

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी, आशयसंपन्न लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात, या विचाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: