fbpx

असंतुलित जीवनशैलीमुळे तरुणाई मध्ये वाढत आहेत हृदयविकाराचा धोका  

पुणे : भारतात  साधारणतः  वर्षाला  १.५ ते ३ दशलक्ष मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने उद्भवतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार ३५ टक्के मृत्यू हे तरुण वयात आढळलेले आहे .बर्‍याच लोकांना असा समज आहे की हृदयविकार फक्त वयाच्या ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच प्रभावित करतात, परंतु सत्यपरिस्थितीत  हृदयविकाराचे आजार बालपणापासून ते वीस वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कधीही कोणालाही उद्भवू शकतात. कार्डिओव्हॅस्कुलर आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्यांचा जागतिक भार कमी करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. कोविड च्या काळात  हृदयाच्या आरोग्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची प्रवृत्ती वाढत आहे .  

कार्डिओव्हॅस्कुलर रोग  हा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांचा एक समूह आहे ज्यामध्ये कोरोनरी हृदयरोग, सेरेब्रोव्हॅस्कुलर रोग, संधिवात हृदयरोग आणि इतर परिस्थितींचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटना  नुसार पाच पैकी चार पेक्षा जास्त सीव्हीडी मृत्यू हृदयविकाराचा झटकाआणि स्ट्रोकमुळे होतात आणि यापैकी एक तृतीयांश मृत्यू हे ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये अकाली होतात. आपले हृदय हे सर्वात महत्वाचे अवयव असून आपल्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवण्याचे काम  करते आणि टाकाऊ पदार्थ देखील काढून टाकते. हृदयाच्या त्रासाची कोणतीही चिन्हे गांभीर्याने घेतली पाहिजे कारण ती तुमच्या दीर्घायुष्याशी आणि जगण्याशी जोडलेली आहे.  वयाच्या २० व्या वर्षापासून प्रत्येक ५ वर्षांनी   कोलेस्टेरॉल तपासण्याची शिफारस डॉक्टरनकडून करण्यात येते . 

जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयविकाराच्या आजारांविषयी द हार्ट क्लिनिक चे संचालक तञ् डॉ. मधुसूदन आसावा  म्हणाले की चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार, अति धुम्रपान किंवा कौटुंबिक हृदयविकाराचा इतिहास तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकतो.हृदयविकारांवर आजकाल केवळ वयाचा प्रभाव पडत नाही. ते तरुण प्रौढांमध्ये देखील होतात. बालपण आणि पौगंडावस्थेमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते आणि नंतर रक्तवाहिन्या बंद होऊ लागतात. लठ्ठपणा, मधुमेह मेलीटस टाईप-२ असे अनेक घटक आहेत ज्यामुळे तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्येही हृदयविकार होऊ शकतात.  निरोगी जीवनशैली निवडून  हा धोका लक्षणीयरीत्या कमी  करता येऊ शकतो. 

Leave a Reply

%d bloggers like this: