fbpx

‘डाबर होममेड टेस्टी मसाला’  मसाल्यांच्या बाजारात दाखल 

भारतातील आघाडीची एफएमसीजी कंपनी डाबर इंडिया लिम. ने आज डाबर होममेड टेस्टी मसाला लाँच करत आपल्या होममेड फूड्स पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा केली आहे.  ‘डाबर होममेड टेस्टी मसाला’ या नवीन उत्पादनाने डाबरच्या मसाल्यांच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे यामध्ये होममेड मसाला ग्राहकांना चव आणि नैसर्गिक घटक या  दोन्ही गोष्टींचे मिश्रण ऑफर करते, ज्यामुळे त्यांचे पदार्थ नेहमीपेक्षा अधिक चवदार बनतात.

  लॉन्चची घोषणा करताना, डाबर इंडिया लिमिटेड श्रेणीचे खाद्य विभागाचे प्रमुख श्री विनीत जैन म्हणाले, “डाबर होममेड चविष्ट मसाला हा सर्वात ताजे आणि निवडक ११ मसाल्यांपासून बनवलेला बहुउद्देशीय भाजलेला मसाला आहे जो चवीने अन्नाला परिपूर्ण करतो.  स्वादिष्ट चव, सुगंध,  दर्जेदार आणि शुद्धतेच्या हमीसह डाबरच्या घरातून आलेला होममेड टेस्टी मसाला, नावाप्रमाणेच, प्रत्येक खाद्यपदार्थाची चव वाढवतो.  रोजच्या भाज्या (आलू गोभी, भिंडी, मिक्स व्हेजिटेबल, भरलेलं वांग इ.), करी (दम आलू, मटर पनीर, कढई पनीर) आणि डाळ तयार करणे अशा अनेक पदार्थांमध्ये याचा वापर करू शकतो. 

फक्त ५ रु  किंमत असलेला हा  नवीन डाबर होममेड टेस्टी मसाला सॅशे स्वरूपात उपलब्ध असेल.  हे उत्पादन देशभरात ऑनलाइन आणि इतर रिटेल चॅनेलवर उपलब्ध आहे. हे ३६०° लाँच असून टीव्ही, प्रिंट, डिजिटल याशिवाय ऑफलाइन सुद्धा उपलब्ध आहे.  त्याच बरोबर याची सुरवात करताना डाबर ने  बाय  २ गेट १ फ्री ही ऑफर सुद्धा ग्राहकांना दिली आहे. 

  श्री जैन पुढे म्हणाले, “डाबर होममेड टेस्टी मसाला लाँच करून, आम्ही ग्राहकांना त्यांच्या रोजच्या जेवणाची चव अधिक वाढवन्यासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देत आहोत.  आम्हाला खात्री आहे की वापरण्यास सोप्या असलेल्या या डाबर होममेड टेस्टी मसाला वापरून ग्राहकांना त्यांच्या जेवणाची चव वाढवायला आम्हाला आनंद होईल.”  

Leave a Reply

%d bloggers like this: