fbpx

पुणे नवरात्र महोत्सव – ‘हिंदी-मराठी व इंग्रजी गीतांनी’ श्रोत्यांची मने जिंकली

पुणे:जय जय शिवशंकर…जय शारदे जय शारदे माँ शारदेदेवी या भक्‍ती गीतांसह ऐरणीच्या देवा.., चंद्रा चित्रपटातील ‘बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा…चंद्रा’ या बहारदार लावणीसह लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं, तुझ्या ऊसाला लागल कोल्हा ही ठसकेबाज लावणी, दिल हे छोटासा छोटीशी आशा, जिया रे जिया रे, मेरे सपनों की राणी या हिंदी गीतांच्या सादरीकरणाबरोबर पॉप, क्लासिक, इंग्रजी गाणी गायकांनी सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.

पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आयोजित गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सवात सायंकाळी ‘नवशक्‍ती’ हा हिंदी, मराठी व इंग्रजी गीतांचा कार्यक्रम पार पडला. गायिका प्रियंका बर्वे, प्रांजली बर्वे, गायक सौरभ दप्तरदार यांनी गीतांचे सादरीकरण केले. अभिजित कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. दर्शना जोग व अमृता ठाकूर-देसाई (कि र्बोर्ड), तन्मय पवार (गिटार), अजय अत्रे (वेस्टर्न रिदम), कहान जोग (ड्रम), अपूर्व द्रविड (तबला) या कलाकारांनी साथसंगत केली. या सर्व कलाकारांसह राजीब बर्वे व डॉ. संगीता बर्वे यांचा सत्कार अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सदस्य अमित बागुल, गजानन माने, वसंत दुर्गे, उद्योजक सौमित्र गुपचुप यांनी केला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल उपस्थित होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: