fbpx

पुणे नवरात्र महोत्सव – “तेजस्वीनी” पुरस्कार प्रदान

पुणे:”यादेवी सर्व भुतेषु, शक्ति रूपेण संस्थिता” अशी ‘ती’ म्हणजे स्त्री तीचा हा सन्मान करण्यात आला निमित्त होते ते, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे! त्यात भाग्यलक्ष्मी स्पर्धा २०२२ च्या अंतर्गत पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या सोहळ्याचे अतिशय दिमाखदार उद्घाटन झाले प्रारंभी सर्वांनी लक्ष्मी मातेचे मादिर्त जाऊन दर्शन घेतले त्यानंतर दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

जेष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी जेष्ठ गायिका अनुराधा मराठे ,मोडेलिंग -ग्रुमिंगतज्ञ जुई सुहास आणि बाल अभिनेत्री सह्याद्री क्रांती मळेगांवकर त्यांना या प्रसंगी तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५००० रुपये रोख ,देवीची प्रतिमा ,सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक, अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यावेळी मंचावर उपस्थित होते .त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती शंखनादासह झाली. संडी ग्रुपच्या कलाकारांनी अतिशय उत्तम नृत्य अविष्कारा सह देवीचा गोंधळ आणि गणेश वंदना सादर केली त्या वेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा उत्तम कडकडाट केला.

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्केटिंग क्रिडापटू श्रुतिका जयकांत सरोदे व वैदेही जयकांत सरोदे या भगिनींचा सन्मान यावेळी आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच नगरसेविका वैशाली मराठे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी यांचेही विशेष सत्कार यावेळी करण्यात आले. क्रांती मळेगावकर यांनाही यावेळी सन्मानित केले गेले .सँडी ग्रुपच्या डान्स कलाकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या ,पी एस आय श्रीयंवदा जाधव यांनाही यावेळी सन्मानित केले गेले.या महोत्सवाचे सुत्रसंचालन किर्ती रामदासी यांनी खुमासदारपणे केले. त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी आभार प्रदर्शन केले.

या नंतर होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली त्यामध्ये २५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता त्याचा निकाल पुढील प्रमाणे :

रिझल्ट –

१ प्रथम क्रमांक – मनीषा लक्ष्मण सोंडगिर – बक्षीस -टी व्ही

२ द्वितीय क्रमांक – सुनिता संजय शिंदे – बक्षीस -फ्रीज

३ तृतीय क्रमांक – प्राजक्ता आहीरेकर – बक्षीस – पैठणी

४ चतुर्थ क्रमांक – रागिणी हिंगाने – बक्षीस – पैठणी

उत्तेजनार्थ – दीपिका बहिरट – बक्षीस – कुकर

Leave a Reply

%d bloggers like this: