माजी सैनिक आघाडी भाजपापासून काडीमोड घेणार?
पुणे : भाजपला आता मोठा झटका बसण्याची शक्यता दिसत आहे. भाजपशी संलग्न असणारी माजी सैनिकांची संघटना भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यभरातील सैनिकांनी भाजपविरोधात लढाईला सुरूवात केली असून, भाजपला जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
मागील ९ वर्षापासून केंद्रात भाजप सत्तेत आहे, तसेच राज्यात देखील सत्तेत आहे. असे असतानाही भाजप सरकारकडून सैनिकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सैनिकांच्या हितामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील सैनिकांनी भाजपविरोधात रण पुकारले आहे.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माजी सैनिक आघाडीचे प्रतिनिधी मुंबईत एक वाजता माजी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सैनिक आघाडी ने तीच भूमिका कायम ठेवली आहे.