गोपाळकृष्ण शाळेत नवरात्रौत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्ररंगभरण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, महाभोंडला, महिला पालक स्पर्धा, विविध प्रकारचे मुखवटे बनवणे-कार्यशाळा आदी उपक्रमांचे आयोजन नवरात्रौत्सवानिमित्त करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा म्हणून सदर उपक्रम प्रशालेत राबविण्यात येत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी यावेळी सांगितले. सदर सर्व उपक्रमांची संकल्पना रणजित बोत्रे यांची होती. चित्ररंगभरण स्पर्धेत इयत्ता पहिलीतून आजान शेख- प्रथम , निशा धोत्रे-द्वितीय , श्रावणी सकटे-तृतीय , दुसरीतून समीक्षा रेवडे-प्रथम , रोहन उपाध्याय – द्वितीय ,पंकज गाढवे-तृतीय, तिसरीतून मिताली धोत्रे-प्रथम , खुशबू डोंगरे – द्वितीय, अजय जाधव – तृतीय व इयत्ता चौथीतून जोहान शेख- प्रथम, रणवीर देवासी- द्वितीय, अंश प्रजापती-तृतीय असे विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. चित्ररंगभरण स्पर्धेचे नियोजन विशाल चव्हाण यांनी केले. यावेळी गीतांजली कांबळे,दिपाली गावडे ,मंदाकिनी बलकवडे उपस्थित होत्या.