राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा फोटो येत्या ८ दिवसात नाही लागला तर महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करणार -चेतन शिंदे
पुणे : राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा मंत्रालयात लावलेला फोटो कुणी? का? व कसा? काढला या बाबत मी आज सामान्य प्रशासन, विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग यांना भेटून विचारणा केली असता योग्य उत्तर मिळाले नाही म्हणून मी सदर विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्यंत तत्काळ पोहचविण्या करीता खा.हेमंत गोडसे साहेब, मा.खा.डॉ.विकास महात्मे साहेब, माजी मंत्री दत्ता मामा भरणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष मा.नरेंद्र पाटील ,आ.अभिमन्यू पवार , आ.गोपीचंद पडळकर , विजयराज शिंदे आ.किशोर जोरगेवार , आ.जयकुमार गोरे , आ.विक्रम सावंत , आ.कालिदास कोळंबकर , जयदत्त क्षीरसागर यांना विनंती केली.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा फोटो येत्या ८ दिवसात नाही लागला तर महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल . असा इशारा राष्ट्रिय ओबीसी युवा महासंघ महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे यांनी दिला आहे.