Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अजिंक्य सोशल फौंडेशन कडून वृद्धांना मदतीचा हात

पुणे:”आभाळाची माया तुझी आम्हावरी राहू दे, राहू दे”,या गाण्यातील बोला प्रमाणे दिनकर पवार व कल्याणी पवार यांच्या जनहरि युवा फाऊंडेशन संचलित व्दरका वृध्दाश्रम खेड या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे, आधुनिक जगात एकीकडे २१ शतकाचे नवीन विचार,आणि दुसरीकडे वाढती वृद्धश्रमाची संख्या हा खरच समाजाला विचार करण्यास भाग पडणार प्रश्न येथे भेडसावत आहे, तरी पण या जगात एक म्हण आहे, “देव तारी त्याला कोण मारी ” या उक्ती प्रमाणे आज पण अजिंक्य सोशल फाउंडेशन , पुणे यांच्या सारख्या सामाजिक संस्था या नेहमीं “एक हात मदतीचा” या संकल्पनेतून समाजाचे काही तरी ऋण फेडणे हे आपले पहिले परम कर्तव्य असून ते कर्तव्य फेडण्याची भूमिका करतानी दिसून येते. 

 यां वृद्धश्रमात एकूण १५-२० वृध्द लोक राहतात,त्यांचा संभाळ करणे , योग्य काळजी,त्यांना आहार देणे, सर्व काळजी द्वारका वृध्दश्रम चे संचालक अध्यक्ष दामोदर पवार व कल्याणी पवार व संपूर्ण पवार कुटुंबीय या वृद्धलोकाची देखभाल घेणे, विशेषतः शासन कडून कोणताही अनुदान मिळत नसून वेगवेगळ्या संस्था देणगी स्वरुपात आणि शेती जे मिळते त्या मधून मिळते, त्यामध्ये अजिंक्य सोशल फाउंडेशन यांच्या वतीने पण वृध्दश्रमाला काही खाद्य पदार्थ तांदूळ, डाळ, बिस्कीट आदी साहित्य देण्यात आले, या वेळी अजिंक्य सोशल फाऊंडेशन चे संस्थापक सचिन पवार, बाळासाहेब राठोड, संगीता भालेराव, जानकी घोडके, प्रीतम घोडके, अनुष्का भालेराव, सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यावहस्ते वाटप करण्यात आले.
वृद्धश्रम ही एका बाजूने पहिल्यास समाजाची गरज,सोय,आणि निवड या तिन्ही गोष्टी साठी दिसून येत आहे, यामध्ये सध्याचे काळात दिवसे न दिवस वृध्दश्रम हे वृध्दश्रम न राहता ते वानप्रस्तश्रम महणुन नव्याने ओळख निर्माण होतानी दिसून येत आहे. या प्रसंगी असंख्य वृद्धांची उपस्थित होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading