fbpx

पक्षात काय सुरू आहे मला माहित नाही, सरकारमधील मी एक पार्ट ॲण्ड पार्सल – तानाजी सावंत

पुणे : प्रत्येक कार्यकर्त्याला व नेत्याला आपल्या पक्षात काय सुरू आहे याची माहिती असते. पण आपल्या पक्षात काय चालू आहे याची मला माहितीच नाही असे उत्तर शिंदे सरकार मधील एका महत्त्वाच्या मंत्र्यांनी दिले आहे.
शिंदे गटातील महत्वाचे नेते तानाजी सावंत यांना पक्षात काय सुरु आहे? याबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ . असे उत्तर दिले .व शिंदे-फडणवीस सरकारमधील मी एक पार्ट ॲण्ड पार्सल आहे.असे उत्तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
यावरून मंत्री तानाजी सावंत यांना शिंदे गटातुनही साईडलाईन केलं जातंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान, बाळासाहेबांची सावली असलेले थापा तुमच्याकडे आलेत या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया मंत्री सावंत यांनी दिली.
दसरा मेळाव्याबाबतच्या प्रश्नांवर तानाजी सावंत म्हणाले, दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असतो. दसरा मेळावा बाळासाहेब दिघें यांच्या विचाराचा मेळावा आहे. सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यावा. असे तानाजी सावंत म्हणाले.
शिंदे गटातील चाळीस आमदार नाराज आहेत अशी चर्चा आहे त्यावर तानाजी सावंत म्हणाले, आमच्या गटातील चाळीस आमदार व जे आमच्याबरोबर अपक्ष आहेत . भाजपमधील कोणीही नाराज नाही. असे तानाजी सावंत म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: