fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी भाजपची मागणी

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा? ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असं वक्तव्य आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे. त्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आणि ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला. आज पुण्यात भाजप तर्फे छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले. या आंदोलनाला प्रमोद कोंढरे, राजेश येनपूरे, दीपक पोटे, गणेश घोष भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले, छगन भुजबळ यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील.मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असेही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत.
परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी.

Leave a Reply

%d