fbpx

विश्वेश्वर सहकारी बँक ठरली ‘सर्वोत्कृष्ट बँक’

पुणे : सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी विश्वेश्वर सहकारी बँकेला द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे ‘सर्वोत्कृष्ट बँक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्थिक वर्ष २०२१ -२०२२  करीता ‘₹ २५०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँक’ या गटासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेडरेशनतर्फे नुकतेच मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनिल रुकारी, उपाध्यक्ष अजय डोईजड, संचालक अनिल गाडवे, राजेंद्र मिरजे, दत्तात्रय कामठे, सुभाष लडगे, अतुल रुकारी, अ‍ॅड.पुरुषोत्तम लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, उप सरव्यवस्थापक राजेंद्रकुमार साठे हे उपस्थित होते.
या पुरस्काराबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे म्हणाले, “ हा पुरस्कार मिळाल्यानंतर विश्वेश्वर बँकेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बँकेचे संचालक मंडळ सतत नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारुन, ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा पुरवत असते. त्यासाठी मार्च २०२२ अखेर माजी अध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष सीए मनोज साखरे व अन्य संचालकांनी राबविलेल्या योजना,उपक्रम व त्या यशस्वी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करणारा अधिकारी व सेवक वर्ग यांच्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.’’

Leave a Reply

%d bloggers like this: