fbpx

शिवसेनेच्या महिलांची मैत्रीच्या बये दारं उघड अभियानास सुरुवात : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक:राज्यातील सर्व स्तरातील महिलांना सुरक्षा, शक्ती, विकास होण्याबाबत देवी सर्वांना आशीर्वाद देवो. राज्यात स्थिर सरकार येण्यासोबतच महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे. प्रगतीची दारे खुली होऊन त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे अशी प्रार्थना आज रेणुकामातेचे चरणी केल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

नवरात्र उत्सवास नुकतीच सुरुवात झाली आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, युवा नेते अदित्यजी ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकारातून आज ‘बये दार उघड’ या मोहिमेचा शुभारंभ चांदवडमध्ये करण्यात आला. येथे श्री. रेणुकामाता दर्शन आणि आरती करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या मंदिरात आज हा शुभारंभ झाला
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने महिलांशी शिवसेनेची मैत्री जोडली जाण्याचे हे अभियान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, संगीता खोदाना, नाशिक शिवसेना महीला आघाडी पदाधिकारी श्यामल दीक्षित, ओमप्रकाश (भैय्या) बाहेती, तहसीलदार प्रदीप पाटील, देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त सुभाष पवार, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेना पुणे महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, प्रा. विद्या होडे, युवासेना सचिव शर्मिला येवले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: