Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – अतुल सावे

महाज्योतीच्या संचालक मंडळाची नुकतीच मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री अतुल सावे बोलत होते. यावेळी या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे,संचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाड,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल वासनिक,कंपनी सेक्रेटरी अविनाश गंधेवार उपस्थित होते.

अतुल सावे म्हणालेपीएच.डी. करणाऱ्या उमेदवारांना अवॉर्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी रु.३१ हजारतसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षासाठी रु.३५ हजार तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एम. फिल. उमेदवारांना एम. फिल ते पीएच.डी. असे Integrated (एकत्रित ) देण्याबाबत बार्टीपुणे च्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी नुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री सावे म्हणालेएम. फिल. उमेदवारांना रु.३१ हजारघरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याचाही निर्णय घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन रु.१३ हजार आणि रुपये १८ हजार आकस्मिक एकवेळ खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांना रु.२५ हजार एकवेळ अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना रु.१० हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  सावे यांनी सांगितले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading