fbpx

नवनीत टॉपटेक तर्फे भारतातील शिक्षक समुदायाला सक्षम करण्यासाठी टॉप सर्कल कॉन्क्लेव्हचे आयोजन

पुणे: भारतातील शाळा आणि विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सोल्यूशन्स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणारी आणि वेगाने वाढणारी डिजिटल शिक्षण कंपनी नवनीत टॉपटेकतर्फे शहरातील सीबीएसई शिक्षकांसाठी टॉप सर्कल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनेक पैलूंवर चर्चा करून शालेय अध्यापन समुदायाला सक्षम बनवणे हा या परिषदेचा उद्देश होता. अध्यापन आणि अध्ययन वाढविण्यासाठी अध्यापनशास्त्रीय नवकल्पना कशी वाढवायची यावरही प्रकाश टाकला. या कॉन्क्लेव्हमध्ये पुण्यातील प्रतिष्ठित सीबीएसई शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते.

नामांकित सीबीएसई शाळांमधील सन्माननीय पॅनेल सदस्यांनी ‘डेव्हलपिंग पेडागॉजिकली स्कॅलेबल स्कूल्स’ या विषयावर विचारप्रवर्तक आणि मौल्यवान माहिती सादर केली. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत जेथे सीबीएसई शाळेचे मुख्याध्यापक शाळेसाठी अध्यापनशास्त्र अग्रणी म्हणून बहुआयामी भूमिका बजावत आहेत तेथे चर्चासत्र आणि त्यानंतरच्या मूल्यमापन समजून घेण्यावरील कार्यशाळेने या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना मूल्यांकन समजून घेण्यात मदत केली. कार्यशाळा शिक्षकांना विद्यार्थ्याची प्रगती समजून घेण्यास आणि त्यांच्या संस्थांसाठी त्यांचा शिकवण्याचा दृष्टिकोन पुन्हा परिभाषित करण्यात मदत करते.

“टॉप सर्कल कॉन्क्लेव्ह हा देशभरातील शिक्षकांशी संवाद साधण्याचा आणि समुदाय उभारणीतून   माहिती मिळवून मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा एक असा समुदाय आहे जो देशभरातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सक्षम बनवतो. आमच्या विशेष समुदायामध्ये, आम्ही शिक्षकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या अध्यापन प्रवासात परिवर्तन घडवून आणण्यासाठी यशोगाथा, संसाधने, किस्से, फोटो, उपयुक्त टिप्स आणि तथ्ये शिक्षकांबरोबर शेअर करतो. आम्ही या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतातील विविध शहरांमध्ये २० कार्यशाळा घेण्याची योजना आखत आहोत”, असे नवनीत टॉपटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल गाला म्हणाले.

टॉपसर्कल कॉन्क्लेव्ह हा शिक्षक, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा  मेळावा आहे. संपूर्ण भारतभर आयोजित ही परिषद एनईपी २०२० आणि इतर विविध शैक्षणिक सुधारणांबद्दल शिक्षकांना शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करते. ही समुदाय उभारणी देशभरातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सक्षम बनवून त्यांच्या अध्यापन प्रवासात परिवर्तन घडवते.

Leave a Reply

%d bloggers like this: