Tuesday, October 27, 2026
Latest NewsPUNE

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे : श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज सकाळी ९ वाजता नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. सकाळी देवीला या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. नारायणराव कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. आज पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वाजाता महाआरती करण्यात येणार आहे. तसेच गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण करण्यात येईल. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave a Reply