fbpx

ई-वेस्ट व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडियाटुरिझम मुंबईने केली क्रोमा स्टोर्ससोबत भागीदारी 

मुंबई : १६ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय “स्वच्छता सप्ताह” साजरा करत आहे. “स्वच्छता सप्ताहा”मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम व मध्य क्षेत्राचे कार्यालय इंडियाटुरिझम मुंबईने भारतातील प्रसिद्ध ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समूहाचा एक भाग असलेल्या क्रोमासोबत सहयोग केला आहे.

आजच्या काळात जास्तीत जास्त ग्राहक आपले जीवन अधिकाधिक चांगले व सुखकर बनवण्यासाठी नवनवीन उत्पादने खरेदी करून अपग्रेड करण्यासाठी उत्सुक असतातअशावेळी इंडियाटुरिझम मुंबई आणि क्रोमाने उत्पादनांचा वापर करताना जबाबदारीचे भान राखले जावे या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे मिशन सुरु केले आहे. ई-वेस्टसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडियाटुरिझम मुंबई टाटा समूहाचा एक भाग असलेल्या क्रोमाच्या सहयोगाने काम करत आहे. ई-वेस्ट व्यवस्थापनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

इलेक्ट्रॉनिक वेस्ट (ई-वेस्ट) देशात सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या कचऱ्याच्या प्रकारांपैकी एक आहे.  इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत आहे.  आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये नवनवीन अपग्रेडेशन येत राहतातउत्पादने कालबाह्य होण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहेत्यामुळे ग्राहक त्यांच्याकडील आधीची उत्पादने काढून टाकत राहतातयामुळे घन कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ई-वेस्ट जमा होत राहते. इलेक्ट्रॉनिक वेस्टची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या समस्या विचारात घेऊन आणि ई-वेस्टबाबत जास्तीत जास्त लोकांना जागरूक करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग म्हणून असा कार्यक्रम पहिल्यांदाच हाती घेतला जात आहे.

ई-वेस्ट व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंडियाटुरिझम मुंबई आणि क्रोमाने हातमिळवणी केली आहे.  क्रोमा स्टोर्ससोबत “ई-वेस्ट कलेक्शन बॉक्सेस” कॅम्पेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे खास डिझाईन करण्यात आलेले इनक्रेडिबल इंडिया आणि क्रोमा ब्रॅंडिंग असलेले “ई-वेस्ट कलेक्शन” बॉक्स ज्यांना महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ५० पेक्षा जास्त क्रोमा स्टोर्समध्ये ठेवण्यात आले आहे.  “भारत नेहमी अतुल्य रहावा यासाठी आम्हाला साहाय्य करा” ही टॅगलाईन या बॉक्सेसवर लिहिण्यात आली आहे.

अपग्रेड करण्याची आणि नवनवीन डिव्हायसेस खरेदी करण्याची लोकांची इच्छा आजच्या काळात खूप तीव्र झाली आहे. दरवर्षी लोक नवीन आणि अपडेटेड डिव्हायसेस खरेदी करतात आणि जुन्या वस्तू टाकून देताततेव्हा या फेकून दिलेल्या जुन्या वस्तूंचे करायचे काय हा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत चालला आहे. या समस्येच्या निवारणासाठी इंडियाटुरिझम मुंबई आणि क्रोमा यांनी ई-वेस्टची सुरक्षित व पर्यावरणानुकूल पद्धतीने विल्हेवाट लावण्यातील तज्ञ जस्टडिस्पोज (JustDispose) यांच्यासोबत भागीदारी केली आहे. जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात ग्राहकांची मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. एक व्यक्ती जेव्हा पर्यावरणानुकूल पद्धतीने ई-वेस्टची विल्हेवाट लावते तेव्हा क्रोमा त्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावते. इनक्रेडिबल इंडिया ई-वेस्ट कलेक्शन बॉक्सेस संपूर्ण भारतभरातील क्रोमा स्टोर्समध्ये एक वर्षभर ठेवले जातील.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम व मध्य क्षेत्राचे कार्यालय इंडियाटुरिझम मुंबईचे क्षेत्रीय संचालक  डी वेंकटेशन म्हणाले, “भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वच्छता सप्ताहामध्ये ई-वेस्टची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी क्रोमासोबत सहयोग करताना आणि अशाप्रकारे व्यक्ती व पृथ्वीला सर्वाधिक महत्त्व देताना इंडियाटुरिझम मुंबईला खूप आनंद होत आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: