fbpx

पुष्कराज नाट्यनिर्मिती संस्था आयोजित कथाकथन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे – पुष्कराज नाट्यनिर्मिती संस्था आयोजित कथाकथन स्पर्धेत शबाना शेख, सुखदा इनामदार, ओवी कुलकर्णी, सोहम पेनूरकर, स्पृहा सबनीस आणि श्रावी टोपले यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धा मराठी व इंग्रजी भाषेत तीन गटात घेण्यात आल्या होत्या.

कथाकथन स्पर्धेला पहिल्याच वर्षी राज्याच्या विविध भागातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पारितोषिक वितरण निवारा वृद्धाश्रम येथे आयोजित करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना बालरंगभूमी परिषदेच्या पुणे शाखेचे मुख्य कार्यवाहक दीपक रेगे, नाट्य दिग्दर्शक अमोल जाधव, अमर गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात झाले.

मुलांना शालेय वयात नाट्यप्रशिक्षण दिले तर भविष्यात चांगले कलावंत घडण्याबरोबरच चांगले प्रेक्षकही घडू शकतात, असे प्रतिपादन दीपक रेगे यांनी केले. पुष्कर देशपांडे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्ष अंजली दफ्तरदार यांच्या हस्ते करण्यात आला. अनुराधा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, बिपीन दप्तरदार, संस्थेच्या खजिनदार राजश्री देशपांडे, अमर गायकवाड, सौरभ शिंदे, विराज देशपांडे व चिन्मय बेरी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओमकार देशपांडे व यशदा देशपांडे यांनी केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

खुला गट (मराठी) – प्रथम शबाना शेख, द्वितीय सुजाता वझे, तृतीय अभिजीत शिंदे.

खुला गट (इंग्रजी) – प्रथम क्रमांक सुखदा इनामदार.

वयोगट 9 ते 15 (मराठी) – प्रथम ओवी कुलकर्णी,  द्वितीय सई भोसले.

वयोगट 9 ते 15 (इंग्रजी) – प्रथम सोहम पेनूरकर.

वयोगट 5 ते 8 (मराठी) – प्रथम स्पृहा सबनीस, द्वितीय अद्विका राऊत, तृतीय प्रार्थना मोरे, उत्तेजनार्थ  भूंमकित सोनावणे.

वयोगट 5 ते 8 (इंग्रजी) – प्रथम श्रावी टोपले, द्वितीय आर्वी पाटील.

Leave a Reply

%d bloggers like this: