Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने पुणे नवरात्रौ महोत्सवास प्रारंभ

पुणे : कला, गायन, वादन, नृत्य आणि संगीताचा मिलाफ असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवास सोमवारी दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने प्रारंभ झाला. महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.

महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष  रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, जयश्री बागुल, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या उपस्थित होत्या.

यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे, सामाजिक नेते अंकूश काकडे आणि लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम आदींना यावेळी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून धमाल कार्यक्रम व नियोजन पहायला मिळाले. आबा बागुल विधानसभेत येणे गरजेचे आहे. आबा चैतन्यमय व्यक्तीमत्व आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचा महोत्सव आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव म्हंटले‌ तर काही वावगे ठरणार नाही. पुणे हे जशे शिक्षणाचे माहेर घर आहे, तसेच हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. अंकुश काकडे, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्याकडे पाहिल्यावर नवी पिढी कुठे आहे, असे प्रश्न मनात येतो.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आजचा दिवस दृढनिश्चयाचा आहे. या दिवसी आमचा सन्मान झाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. मितेश घट्टे म्हणाले, माणुसकी व माणुसकीचे महत्व कोरोनाच्या‌ काळात समजले. त्या काळात जे कार्य‌ केले, त्याची पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली.

प्रारंभी महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्काराने महोत्सवास सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली. नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे यांनी त्यांच्या शिष्यांसह महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार सादर केला. 

  • रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर केला.
  • विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर केला.
  • सँण्डी डान्स अ‍ॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर केला.
  • पायलवृंदतर्फे अभिनेत्रींनी कॅलिडोस्कोप दिलखेचक नृत्याविष्कार सादर केला. या नृत्याविष्काराते दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे. 

त्यानंतर दीपप्रज्वलन व आरती होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचलन केले. घनशांम सावंत‌ यांनी आभार मानले.

उद्घाटन समारंभानंतर गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे यांनी वाद्यवृंदासह स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading