fbpx

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पुणे पोलिसांकडून कसून शोध सुरू

पुणे : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या प्रकरणामध्ये सायबर फॉरेन्सीक तपासासाठी व्हिडीओ पुरावे पाठविण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. एकीकडे तांत्रिक तपास सुरु असतानाच दुसरीकडे, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयांवर शुक्रवारी रोजी छापे घालत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. एनआयए’च्या या कारवाईच्या पार्श्‍वभुमीवर “पीएफआय’च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान, पोलिसांनी हे आंदोलन गुंडाळले. मात्र, संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात असतानाच, काही कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यासंबंधीचे व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. त्यापुर्वी, अशा घोषणा दिल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र या प्रकरणाचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटल्यानंतर “पीएफआय’च्या 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 141 अंतर्गत नोटीस बजावून सोडून दिले होते. त्यानंतर संबंधित आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यात देशद्रोहाशी संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ पोलिसांकडून गोळा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे व्हिडीओ बंडगार्डन पोलिस ठाण्यात जमा करुन, तेथून ते सायबर फॉरेन्सीक लॅबमध्ये तांत्रिक तपासासाठी पाठविण्यात येत आहेत. तांत्रिक तपास पुर्ण झाल्यानंतरच देशविरोधी घोषणा कोणी दिल्या, त्याबाबतची नावे स्पष्ट होतील, त्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या तरी 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे, 41 जणांना ताब्यात घेऊन सोडले आहे. सध्या तांत्रिक तपास सुरु असून त्यासाठीचे व्हिडीओ फॉरेन्सीकसाठी पाठविले जात असल्याचे पुणे पोलिसांनी माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: