fbpx

PFI तर्फे देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचा जाहीर निषेध – अभाविप

पुणे : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी मुंबई-महाराष्ट्रासह, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले. ‘एनआयए’ने या राज्यांमधील पीएफआय’च्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणांनी शंभरपेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून तब्बल १०६ जणांना अटक केली. या कारवाईपैकी सर्वांत मोठी कारवाई केरळमध्ये करण्यात आली. केरळमध्ये २२ जणांना, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी २० जणांना अटक झाली. याशिवाय तमिळनाडू (१०), आसाम (९), उत्तर प्रदेश (८), आंध्र प्रदेश (५), मध्य प्रदेश (४), पुदुच्चेरी व दिल्ली (प्रत्येकी ३) आणि राजस्थान (२) अशा विविध राज्यांत ही कारवाई झाली. ‘एनआयए’ सह सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि संबंधित राज्य पोलिस दल यांनी १५ राज्यांत ही कारवाई केली.

पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी पुण्यातील PFI च्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचाही व्हिडिओ समोर आला.

या सर्व प्रकरणाचा प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी जाहीर निषेध करत म्हणाले की “देशविरोधी घोषणा देणारे व देशाविरोधात कार्य करणाऱ्या PFI संघटनेचे खरे रूप आज जगासमोर उलगडले असून त्यांच्या कृतींचा जेव्हा मुखवटा उतरवला गेला तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देश विरोधी घोषणा देऊन हे सिद्ध केले की ते कधीच आपल्या देशासोबत निष्ठा ठेवून नव्हते. त्यांचे खरे उद्देश्य हे या देशाला तोडण्याचे होते परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा देश अखंडित होता, आहे व राहील. या संपूर्ण कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप केंद्र व राज्य सरकारला करीत आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: