Wednesday, June 17, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

वी बिझनेस आणि ट्रिलियन्टची भागीदारी भारतामध्ये स्मार्ट मीटरींग प्रकल्पांना इंटिग्रेटेड आयओटी सुविधा पुरवणार

वोडाफोन आयडिया लिमिटेड या आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचा एंटरप्राइज विभाग वी बिझनेसने ट्रिलियन्ट® या ऍडव्हान्स्ड मीटरींग व स्मार्ट ग्रिड सिस्टिम्सना युटिलिटी सुविधा पुरवणाऱ्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपनीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. वी बिझनेस व ट्रिलियन्ट®च्या या भागीदारीमुळे या दोन्ही कंपन्यांची क्षेत्रातील कौशल्ये एकत्र आली आहेतहे संयुक्त बळ भारतात ऍडव्हान्स्ड मीटरींग पायाभूत सोयीसुविधा (एएमआय) प्रकल्पांसाठी इंटिग्रेटेड आयओटी सोल्युशन्स निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करण्यात उपयोगी ठरेल.

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनला पाठबळ पुरवावे आणि देशभरातील २५० मिलियन इलेक्ट्रिसिटी मीटर्स स्मार्ट मीटर बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून देशाच्या वीज वितरण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणावे हा देखील या भागीदारीचा उद्देश आहे.

वी बिझनेस आणि ट्रिलियन्टच्या या भागीदारीमुळे कनेक्टिव्हिटीक्लाऊड आणि व्यवस्थापित सेवांसह एचईएस यांची एकत्रित सुविधा उपलब्ध झाली आहेज्यामुळे भारतातील एएमआय प्रोजेक्ट्ससाठी क्रिटिकल एसएलए प्रदान करून ते टिकवण्यात मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर्स (एमएसआय) / ऍडव्हान्स्ड मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर्स (एएमआयएसपी) मदत होऊ शकते. ट्रिलियन्टसोबत भागीदारीमुळे वी बिझनेसला युनिटी सूट हेड एन्ड सिस्टिममधील जागतिक अनुभवाचा उपयोग करून घेता येईलजे  आयएस १५९५९ ला अनुसरून आहेज्यामुळे मीटरची दैनंदिन माहिती तसेच इंटरव्हल माहिती मिळू शकेल. या भागीदारीमुळे वीज वितरण कंपन्यांना संपूर्ण नेटवर्क व्हिजिबिलिटीसंचालनातील पारदर्शकता आणि किचकट एएमआय प्रकल्पांचे एसएलए व्यवस्थापन या सुविधा मिळतील.

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर अरविंद नेवतीया यांनी सांगितले, “एकीकृत आयओटीच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आणि स्मार्ट मीटरींगमधील व्यापक अनुभव यामुळे वी बिझनेसने वीज वितरण कंपन्या, नागरिक व सेवा पुरवठादारांना स्मार्ट व पर्यावरणानुकूल पद्धतीने वृद्धिंगत होण्यासाठी सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  आमचा असा ठाम विश्वास आहे की, ट्रिलियन्टसोबत आमच्या भागीदारीमुळे आम्हाला मोठमोठे एएमआय प्रकल्प तैनात करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेता येईल आणि भविष्यातील युटिलिटी पुरवठादारांना आधुनिक आयओटी सुविधा पुरवण्यात मदत होईल, ज्यामुळे भारतात एएमआयची अंमलबजावणी अधिक वेगाने होत राहील. देशाच्या ऊर्जा व युटिलिटी क्षेत्राला सेवासुविधा पुरवण्याची आमची वचनबद्धता किती मजबूत आहे हे देखील या भागीदारीतून दिसून येते.  यामुळे वीज वितरण कंपन्यांना एएमआय सुविधांचे लाभ सुरक्षित व एकीकृत पद्धतीने मिळवता येतील.”

आजवरच्या आपल्या कारकिर्दीत वी बिझनेसने नाविन्यपूर्ण आयओटी सोल्युशन्स पुरवून आणि विविध वीज वितरण कंपन्यांच्या एएमआय प्रकल्पांसाठी विश्वासू भागीदार बनून भारतातील ऊर्जा पायाभूत सोयीसुविधांनी सक्षम बनवण्याचा स्वतःचा अतुलनीय ट्रॅक रेकॉर्ड उभा केला आहे.  सध्या वी बिझनेस २५ वीज वितरण कंपन्यांसोबत काम करत असून देशामध्ये जवळपास ३० लाख मीटर यशस्वीपणे कनेक्ट केल्याची ख्याती निर्माण केली आहे.  आजच्या घडीला देशभरातील दर ३ पैकी २ स्मार्ट मीटरना वीच्या सेवासुविधा मिळत आहेत.

ट्रिलियन्टचे चीफ सोल्युशन्स ऑफिसर डॅन लॅम्बर्ट म्हणाले, “वी बिझनेससारख्या आघाडीच्या कम्युनिकेशन्स पुरवठादार कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीने आम्हा दोन्ही कंपन्यांसाठी ज्या लक्षणीय संधी निर्माण केल्या आहेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात आम्ही ज्या संधींचा लाभ घेऊ शकणार आहोत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.  आजवर ट्रिलियन्टने भारतात उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ७ कंपन्यांसाठी ६ वेगवेगळ्या मीटर व्हेंडर्सकडून १.५ मिलियनपेक्षा जास्त स्मार्ट मीटर तैनात केले आहेत. ट्रिलियन्टकडे असलेला एएमआय आणि आयओटी क्षेत्रातील सखोल अनुभव आणि श्रेणीतील सर्वोत्तम सोल्युशन्स व दमदार कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड असलेला वीचा ब्रँड यांच्या भागीदारीमुळे आम्ही भारतातील कंपन्यांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरवू शकू.”

भारतामध्ये २५० मिलियन पारंपरिक मीटरचे रूपांतर स्मार्ट मीटर्समध्ये करण्याचे स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट मीटर हे एका वेब-बेस्ड मॉनिटरिंग सिस्टिम (एचईएस) ने जोडलेले असतात ज्यामुळे कंपन्यांचे नुकसान कमी होण्यात मदत होतेकार्यक्षमता वाढतेउत्पन्नात वाढ होते आणि वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी देखील स्मार्ट मीटर खूप उपयुक्त ठरू शकतात. मोठ्या कंपन्यांच्या डिजिटल परिवर्तन उद्दिष्टांसाठी आयओटीचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे बनले आहेखासकरून ज्या वीज वितरण कंपन्या दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात एटीअँडसी तोटे सहन करत आहेतआव्हाने झेलत आहेत त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे.  बहुतेक एएमआय हितधारक आपापली कामे करत राहतात आणि वीज वितरण कंपन्यांना एएमआयमधून मिळू शकतील असे वृद्धीचे मोठे लाभ मिळवण्यापासून रोखतात.  देशात एएमआय प्रकल्पांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या आणि भविष्यात उपलब्ध होतील अशा संधींसाठी कनेक्टिव्हिटीक्लाऊड आणि व्यवस्थापित सेवांसह एचईएस अशा एकत्रित सेवासुविधा प्रदान करण्यासाठी वी बिझनेस व ट्रिलियन्ट एकत्र येऊन काम करतील.  वी बिझनेसने एएमआय कंपन्यांसाठी एक वन स्टॉप शॉप उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे वीज वितरण कंपन्यांना किंवा एसपीना आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव प्रदान करता येईल व दीर्घकालीन प्रकल्पांचे यश सुनिश्चित करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading