fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” कार्यक्रमांचे आयोजन

पुणे: महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे असून, महाराष्ट्रातील लाखो घराण्यांचे कुलदैवत या साडेतीन शक्तिपीठांच्या कुलस्वामिनी आहेत. नवरात्रातील या सर्वच देवींचे रूप व शक्तीचे तेज अवर्णनीय असते. अशी समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. नवरात्रउत्सवाचे औचित्य साधून या वर्षी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा  पाटील, बारामती टेक्सटाइलच्या अध्यक्षा  सुनेत्रा  पवार, स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या सहकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, भारती विद्यापीठ इंटरनॅशनल विभागाच्या डॉ. किर्ती महाजन,  झेलम चौबळ-पाटील,  जान्हवी धारिवाल, बीव्हीजी ग्रुपच्या संचालिका वैशाली गायकवाड,  ज्ञानेश्वर बोडके, पुणे महानगर पालिकेच्या मुख्य वित्त अधिकारी उल्का कळसकर यांचा सन्मान करणार येणार आहे. विशेष म्हणजे हा सन्मान ९ दिवस या ९ नवदुर्गांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी सांगितले आहे.

तसेच नवरात्रीच्या निमित्ताने पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी “सेल्फी विथ नवदुर्गा” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी नऊ दिवस आपले विविध वेशभूषांमधील देवी सोबतचे फोटो #selfiewithnavdurga या हॅशटॅगसह फेसबुक व इंस्टाग्राम वर पोस्ट करावयाचे आहे. तसेच हे फोटो ९१७२९५९२२२ / ९१७५२२८३३३ या क्रमांकावर व्हाट्सॲप देखील करायचे आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नऊ विजेत्यांना दररोज नऊ पैठण्या देण्यात येतील. असे एकूण ८१ पैठन्यांचे बक्षीस या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Reply

%d