fbpx

मोटो व्हॉल्ट मध्ये मल्टी-ब्रँड सुपरबाइक उपलब्ध

पुणे, : महावीर ग्रुप च्या आदिश्‍वर ऑटो राइड इंडिया या कंपनीने पुण्यातील पहिल्या मोटो व्हॉल्ट शोरूम मध्ये  मोटो मोरीनी आणि झोन्टेस सारख्या मल्टी-ब्रँड सुपरबाइक उपलब्ध असणार आहे.
वरुण झबाख यांच्या नेतृत्वाखाली ही सुरु असलेली अगदी नवीन अत्याधुनिक सुविधा द मेट्रोपॉलिटन वाकडेवाडी, पुणे,  येथे आहे. मोटो व्हॉल्ट आश्‍वासक नेतृत्वाखाली विविध ब्रँड्सच्या सुपरबाइकच्या विशाल श्रेणीला हायलाइट करण्यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. शोरूममध्ये मर्चेंडाइज आणि अ‍ॅक्सेसरीज देखील प्रदर्शित केल्या जातील, आणि सर्व मोटरिंग आवश्यकतासाठी वन -स्टॉप शॉप असेल.
विकास झाबख आदिश्‍वर ऑटो राइड इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, या पहिल्या डीलरशिपच्या उद्घाटनासह, मोटो व्हॉल्ट भारतातील मोटरसायकल उत्साही लोकांना जागतिक स्तरावर स्वीकृत मल्टी-ब्रँड फॉरमॅटमध्ये प्रवेश प्रदान करते. जागतिक स्तरावर या फॉरमॅटने पकड मिळवली आहे आणि भारतातील आमच्या भागीदारांसोबत, जे सुधारित ग्राहक सेवेची आमची दृष्टी प्रदर्शित करतात, त्या आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट खरेदीचा  आणि मालकीचा अनुभव प्रदान करू याची खात्री आहे. तसेच  मोटो व्हॉल्ट या पुणे सुविधेसह देशभरात 23 टच पॉइंट्सचे मजबूत नेटवर्क स्थापन करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: