fbpx

डॉ. गुलजार शेख यांची प्रशिक्षकपदी निवड

पुणे   : आगामी होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सॉफ्टबॉल खेळासाठी आबेदा इनामदार जुनिअर कॉलेज फॉर गर्लचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गुलजार शेख यांची महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.  गुजरात येथे होण्याऱ्या राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी राज्य सॉफ्टबॉल संघाचे प्रशिक्षण व पूर्वसराव शिबीर २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी संघ जळगाव येथून अहमदाबाद राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रस्थान करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: