fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर पुणे पोलिसांनी केला देशद्रोहाचा गुन्हा दाखल

पुणे: पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवासेना, मनसे आणि भाजपने या आरोपींवर देशद्रोहाची कलमं लावण्याची मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत देशद्रोहाचं कलम 124A कलम कोणत्याही गुन्ह्यात लागू करताच येत नाही, म्हणून पुणे पोलिसांनी संबंधित 124A हे कलम पुन्हा हटवलंय… बाकीची कलमं मात्र कायम राहणार आहेत. पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातच याविषयीचे कलम ऍड करण्यात आलं आहे. कलम 153, 109, 120 ब ही आरोपींविरुद्ध नव्याने ऍड करण्यात आली आहेत. यातलं कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट तयार करणे, अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी देशभरात एनआयएने पीएफआयच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणा पीफआय कार्यकर्त्यांनी दिल्या असल्याचे नमूद केले होते. मात्र, प्रकरण तापल्यानंतर गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी देशद्रोहाचे कलम अॅड केले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: