fbpx

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क एकनाथ शिंदे यांना मिळायला हवं होतं -रामदास आठवले

पुणे : मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आता दसरा मेळाव्याच्या वादावर पडदा पडल्याचं दिसत आहे. तरी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी दाखवली आहे. शिवाय शिंदे गटाला बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तिथे शक्तिप्रदर्शन करत शिंदे गट दसरा मेळावा भरवण्याचीही शक्यता आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती हाती आलेली नाही. त्यावर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान एकनाथ शिंदे यांना मिळायला हवं होतं. असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले,उद्धव ठाकरेंना दुसरं मैदान द्यायला पाहिजे. हायकोर्टाने जो निर्णय दिला तो आता मान्य करायलाच पाहिजे. खरंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचेही मेळावे व्हायला हवेत. असे रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या बारामती दौऱ्या विषयी रामदास आठवले म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडून आण्यासाठी गेल्या आहेत. आम्ही बारामतीची सीट जिंकून आणू शकतो. बारामतीची जागा ही शरद पवार यांची आहे; पण तिथे जिंकून यायच, असा आमचा निर्धार आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये ४५ सीट जिंकण्याचे आमचे स्वप्न आहे. बारामतीत शरद पवार यांची हार नको; पण आमचा विजय झाला पाहिजे.असे
रामदास आठवले म्हणाले. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याविरुद्ध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले,राज ठाकरे यांना पॉलिटिकल फायदा होत नाही. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये त्यांनी वाद लावू नये. आधी त्यांच्याकडे बरेच रंग होते आता ते एका रंगाकडे वळले आहेत. आम्हाला मात्र निळा आणि भगवा आवडतो. पाकिस्तान झिंदाबाद घोषणेला कोणीही पाठिंबा देणार नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करणे, ही भूमिका घेतली असेल तर आमचा पाठिंबा आहे.असे रामदासआठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाकडे अजूनही चिन्ह नाही. त्यावर रामदास आठवले म्हणाले,पण आम्ही निवडणूक आयोगाला तराजू मशाल हे चिन्ह मागितले आहे. असे रामदास आठवले म्हणाले. आठवले म्हणाले
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद भेटत आहे त्यावर रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर भारत तोडो यात्रा आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे. कारण, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करायचा आहे. मोदींचा सामना म्हणजे बच्चो का खेल नहीं हैं. असेही राहुल गांधी यांना रामदास आठवले यांनी सुनावले.

Leave a Reply

%d bloggers like this: