fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी

पुणे : पर्वतीच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान घडला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी 2 लाख कधी 3 लाख तर कधी 5 लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. 386 आणि आय टी अ‍ॅक्ट कलम 66 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर गुन्ह्याच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी सांगितले की,बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्हयात आमदार माधुरी मिसाळ यांचे दिर दीपक मिसाळ याना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असणारा मोबाइल नंबर वापरण्यात आला आहे. असा गुन्हा दाखल असून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: