Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

प्रवाशी महिलेशी अश्लिल वर्तन करणारा बसचालक जेरबंद

पुणे : हैद्राबाद-पुणे स्लिपर कोचने प्रवास करताना महिलेशी अश्लिल वर्तन करणार्‍या बसचालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार नामपल्ली हैद्राबाद ते पुणे स्टेशनच्या दरम्यान प्रवासात घडला. शेख अस्लम शेख अलिमउद्दीन (वय २७, रा. शरीफनगर, हैद्राबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला शहा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नामपल्ली हैद्राबाद ते पुणे स्टेशन या स्लिपर कोचने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान बसचालक त्यांच्याजवळ आला. त्यांचे डोके दाबून देण्याचा बहाणा करुन फिर्यादीच्या शेजारी झोपला. त्यांना जबरदस्तीने कुशीत घेऊन त्यांच्या मानेचे मागील बाजूस किस करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading