fbpx

पाकिस्तान झिंदाबाद घोषणा च्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार -पोलीस उपायुक्त सागर पाटील

पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकारांना दिली .
सागर पाटील म्हणाले, सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे सागर पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: