fbpx

देशविरोधी प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.-जगदिश मुळीक

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संशयास्पद संस्थेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे झालेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली नाही तर ही प्रवृत्ती देशभर फोफावेल. जे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. यासंदर्भात आज पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणाऱ्यांवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळ व विविध संघटना यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या राज्यात देशविघातक कारवायांना कधीही थारा मिळू शकत नाही. पुन्हा कुणीही पाकिस्तानी धार्जिणे कृत्य करण्यास धजावू नये यासाठी राष्ट्रद्रोह्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करण्याची मागणी आज करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मा.आमदार योगेश टिळेकर, प्रभारी धीरज घाटे, मा.सभाग्रह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंपुरें, दिपक नागपुरे, दिपक पोटे, संदिप लोणकर, दत्ताभाऊ खाडे,सुशिल मेंगडे, रा.स्व.संघाचे महेश पोहणेरकर, धनंजय काळे, बजरंग दलाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: