Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते.यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या च्या कार्यकर्त्यांनी जर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा केली असेल.तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. त्याप्रमाणे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

दोन वेगवेगळे व्हिडीओ आले असून त्यांची चौकशी केली जाईल. पण महाराष्ट्रात कोणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या तर आम्ही त्यांना सोडणार नाही. असा इशारा देवेंद्र फडवणीस यांनी दिला. वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील विरोधीपक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारवर चौफेर टीका केली.प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. याच वेदांता प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. त्यावर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तो प्रकल्प आधीच गुजरातला गेला. आम्ही वेदांता प्रकल्पासाठी प्रयत्न केले’. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातून आणखी एक प्रकल्प गेल्याच आदित्य ठाकरे म्हणत आहेत. माझा त्यांना सवाल आहे.मेडिकल डीव्हईस प्रोजेक्ट राज्यात येणार होता.एका चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकतात. आपल्या काळात काही करायच नाही.तुमच्याकडे अडीच वर्ष होत ना,त्या काळात केंद्र सरकारला केवळ शिव्या द्यायच काम केल.आता मनात येईल ते बोलतात.माझा त्यांना एक सवाल आहे.एक चिठ्ठी तर दाखवा की,मेडिकल सायन्स डीव्हईस प्रोजेक्ट आपल्या राज्यात मंजूर झाला होता.रोज बोलायच खोटे बोलायच,रेटून बोलायच.यामुळे महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही.आम्ही हिमतीने महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणली आणि यापुढे देखील आणू. 

राज्यातील पालकमंत्र्यांची शनिवारी जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. एक जिल्हा सांभाळताना नाकीनऊ यायचे, फडणवीस ६-६ जिल्हे कसे सांभाळणार, असे अजित पवार यांनी म्हंटले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून मी पूर्ण महाराष्ट्र सांभाळलाय 6 जिल्ह्यांचे काय घेऊन बसलात. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading