Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

इंटरमॅटच्या भारतातील पहिल्या आवृत्तीचा यशस्वी समारोप

पुणे : महामारीच्या तडाख्यानंतर रियल इस्टेट व बांधकाम क्षेत्राने इमारतींच्या आरेखन पद्धतीवर फेरविचार सुरू केला. अशा पार्श्वभूमीवर, इंटरमॅटच्या पहिल्या आवृत्तीत मुंबईमध्ये बांधकाम यंत्रणा तसेच साहित्याच्या विस्तृत श्रेणीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी चर्चासत्रे, व्यावसायिक भागीदारी तसेच संयुक्त करारावर भर राहिला. हा कार्यक्रम 19-21, सप्टेंबर 2022 पासून बॉम्बे कन्वेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव येथे संपन्न झाला.

इंटरमॅटचे नाव जगातील सर्वोच्च 3 बांधकाम कार्यक्रमांत येत असल्याने पात्र वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीवर चारचौघांच्या नजरेत भरले, त्यामुळे संपर्कजाळे बांधले गेले आणि वृद्धीला चालना मिळाली. या प्रदर्शनात, उद्योगातील व्यावसायिकांनी बांधकाम यंत्रणा तसेच साहित्याच्या संपूर्ण श्रेणीवर नजर फिरवली. त्यांची उपस्थिती लक्षणीय असून अधिक क्षमता असलेल्या प्रदेशात व्यवसाय वाढीचा मार्ग खुला झाला आहे.

या प्रदर्शनाने रचनात्मक मंच उपलब्ध करून दिला तसेच सर्वांच्या पसंतीनुरूप मूल्यमापन करत सर्वमान्य संधी, सुधारणेला चमकदार व्याप्ती व याहून बरंच काही दृष्टीपथात आले.

या कार्यक्रमाला 10,000+ व्यावसायिक व्यापाऱ्यांची उपस्थिती लागली, ज्यामध्ये एस, कॅटरपिलर, कोबेलकॉम, पूझ्झोलाना, एनबी इक्विपमेंट, दुसान, हयून्दाई, एम. बी. क्रशर, टाटा कॅपिटल, गल्फ ऑईल, विप्रो, युनिफ्लेक्स आणि अन्य उद्योगातील सर्वात महत्त्वाचे सहभागीदार व प्रदर्शकांचा समावेश होता.

कमएक्सपॉसियम’चे कन्सट्रक्शन बिझनेस युनिट डायरेक्टर इसाबेल अल्फानो म्हणाल्या, “इंटरमॅट’च्या भारताच्या पहिल्या मोठ्या यशानंतर माझ्यात उत्साह संचारला आहे.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “आम्हाला उद्योगातील अग्रगण्य दिग्गजांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला व एका मोठ्या, वाढत्या अर्थकारणाच्या उपस्थितीची नोंद घेतली आहे. ज्यामुळे इंटरमॅट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. आम्ही अगदी वेळेवर हे लॉन्च केले असून देशात आणखी असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

या कार्यक्रमात वित्तीय परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले, ज्यामध्ये वाढत्या पायाभूत क्षेत्राच्या संधीची चर्चा होणार आहे. या परिसंवादात उद्योग क्षेत्रातील मान्यवर जसे की, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेसचे सारोश अमरिया, एनएबीएफआयडीचे राजकिरण राय, हिंदुजा लेलँड फायनान्सचे सचिन पिल्लई यांचा समावेश होता. यामध्ये वॉल्वो, आयटीडी सिमेंटेशन, टाटा हिटाची कन्सट्रक्शन व तत्सम अनेक नामांकित संघटनांचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख वित्तीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. एकंदर, या बैठकीला 200 मान्यवरांनी हजेरी लावली.

इंटर अॅड्स एक्झिबिशन्सचे संचालक राजन शर्मा म्हणाले, “हा कार्यक्रम भव्य होता. आमच्या अपेक्षेपेक्षा देदीप्यमान ठरला आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, धोरणकर्ते आणि ग्राहक एकाच छताखाली येऊ शकले. या प्रदर्शनात कल्पना, सक्षम भागीदारीला उधाण आले. आणि आगामी काळात अशा आणखी आवृत्यांची आम्हाला प्रतीक्षा राहील.”

इंटरमॅट हा व्यापारी कार्यक्रम असून कमएक्सपोसियम या युरोपियन इव्हेंट आयोजक व भारतातील व्यापारी कार्यक्रम आयोजक, इंटर अॅड्समधील भागीदारी आहे. जगातील सर्वोच्च 3 बांधकाम व्यापारी कार्यक्रमात, इंटरमॅटचा उद्देश हा भारतीय बांधकाम उद्योगाला क्षेत्रात आघाडीवर आणण्याचा आहे. इंटरमॅट इंडियाची पुढील आवृत्ती एप्रिल 2024 मध्ये संपन्न होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading