fbpx

पीएफआय सारख्या संघटनांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून बंदीची मागणी करणार‌ -चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर पीएफआय सारख्या संघटनांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून बंदीची मागणी करणार. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे.पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संस्थेवर देशद्रोह गुन्हे दाखल करा,शोधल पाहिजे यांना,संवेदनशील सरकार आहे कारवाई करेल . असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,खोटं बोला पण रेटून बोला. हे आंदोलन खोटारडा आंदोलन आहे.आदित्य ठाकरे याना सवाल आदित्य ठाकरे यांनी जागेचा एमओव्ही आंदोलन जागेवर घेउन यावे,जागेचा शासन आदेश दाखवावा,तरच आम्ही मान्य करू की महाविकास आघाडी सरकारने आणला आणि आमच्या मुळे गेला,मुख्यमंत्री १८ महिने मंत्रालयात आले नाही तो त्यांच्यामुळे वेदांता गेला अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी वर केली. हे आंदोलन सत्तेसाठी पैसा आणि पैश्यासाठी सत्ता सुरू आहे.आदीत्य ठाकरे खोटारडे आहेत, इव्हेन्ट मॅनेजमेंट करतात. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या भाजप घरवापसीवर चर्चा निरर्थक आहेत, मी राज्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याशी याबाबत चर्चा झाली नाहीय. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
वेदांत प्रकल्प हा शिंदे व फडणीस सरकार मुळे राज्याचा बाहेर गेला असे असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर बावनकुळे म्हणाले,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत आहेत,१८ तास काम करत आहेत,या सरकार मध्ये कुठलाच प्रकल्प महाराष्ट्रातून जाणार नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: