fbpx

सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन

पुणे : गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘ स्वच्छता ‘ हा देखील एक उत्सव व्हावा, या हेतूने पुण्यातील भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाच्या वतीने ‘ नमो करंडक स्पर्धा – २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला असून, प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश खत्री म्हणाले,” स्वच्छता हे पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपक्रमांमध्ये सर्वात प्राधान्याचा उपक्रम आहे. आपल्या घर, परिसराची स्वच्छता ही नियमितपणे झाली पाहिजे. स्वच्छता उपक्रमाची एक चळवळ निर्माण व्हावी, आणि तिचे रूपांतर हे उत्सवामध्ये परिवर्तित व्हावे, या हेतूने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच स्वच्छतेचा जागर व्हावा हीच यामागील संकल्पना आहे.”

मागच्या वर्षी या स्पर्धेत एकूण ४२ सोसायटीनीं सहभाग नोंदवत, अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता. स्पर्धेदरम्यान सोसायटी मध्ये जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेस’ चे साहित्य तर महिला कर्मचाऱ्यांना पैठणी देण्यात आली होती. आता या स्पर्धेची सोसायटी सोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही चांगलीच उत्सुकता लागली आहे, असेही खत्री यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: